BJP's Sarcastic Tweet Twitter/@BJP4Mumbai
मुंबई/पुणे

Mumbai : झुकेगा नही, गिरेगा!...खड्ड्यांवरुन भाजपची पुष्पा स्टाईलने टीका, पाहा Video

Potholes Issue In Mumbai : मुंबई महानगरपालिकेनुसार, १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने ७ हजार २११ खड्डे बुजवले आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा (Potholes) प्रश्न गंभीर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुनही मुबईतील रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त नाहीत हे स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) मान्य केलंय. बीएमसीने दावा केला आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबई महापालिकेकडून कमी खड्डे बुजवण्यात आले, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर कमी खड्डे पडले असा दावा मुंबई महानगरपालिकेने केला होता. याबाबत आता भाजपने (BJP) मुंबईतील खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर आणि पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर पुष्पा स्टाईलने टीका केली आहे. (Potholes Issue In Mumbai News)

हे देखील पाहा -

मुंबई भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पुष्पा चित्रपटातील "तेरी झलक अशर्फी" ही सिग्नेचर स्टेप करताना अल्लू अर्जून म्हणजे पुष्पा हा चक्क खाली कोसळतो, त्याचं कारण म्हणजे मुंबईत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे. "मै झुकेगा नही साला..." असं म्हणणारा पुष्पा या खड्ड्यांमुळे "झुकेगा नही गिरेगा" असं म्हणताना दिसतोय. भाजपच्या ट्विटर खात्यावरुन हा मजेशीर अॅनिमेटेड व्हिडिओ शेयर करण्यात आला असून हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. तसेच पुष्पा चे मुंबईत शूटिंग झाले असते तर... असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून हा व्हिडिओ २३ सेकंदांचा आहे. त्याचप्रमाणे बीएमसीतील सत्ताधाऱ्यांच्या राज्यात झुकेगा नही गिरेगा असं म्हणत खड्ड्यांमुळे पुष्पा खाली पडला असं दाखवण्यात आलं असून या पोस्टमध्ये माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांना टॅग करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यावर टीका करण्यासाठी भाजपने क्रिएटीव्ह आणि गंमतीशीर पद्धत वापरली आहे. (BJP Mumbai Slams BMC)

मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने ७ हजार २११ खड्डे बुजवले आहे. तर मागच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये याच कालावधीत १० हजार १९९ खड्डे पालिकेने बुजवले होते. म्हणजेच या वर्षी पालिकेने २९८८ कमी खड्डे बुजवले. याचाच हवाला देत मुंबईतील खड्ड्यांची संख्या घटली असा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. तसेच मुंबईतील इतर प्राधिकरणांनी देखील आपल्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवावेत म्हणून महानगरपालिकेकडून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचंही पालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार करण्याचे ९ मार्ग

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या दाव्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) दर्शवलेले खड्डे यांचीही दखल घेवून तातडीने हे खड्डे भरण्यात येतात. जर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार करायची असेल तर ते खालील ९ मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपली तक्रार नोंदवू शकतात.

१) ऑनलाइन पोर्टल/अ‍ॅप: MyBMCpotholefixit नावाच्या या ॲपवर मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

२) आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 1916 या क्रमांकावर फोन करुन तक्रार करता येईल.

३) मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC) याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल करता येईल.

४) मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयात लेखी तक्रार देता येईल.

५) १८००२२१२९३ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन तक्रार देता येईल.

६) मुंबई महापालिकेच्या @mybmcroads या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग किंवा मेंशन करुन खड्ड्यांची माहिती देत तक्रार करता येईल.

७) बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999 या क्रमांकाद्वारे व्हॉट्सॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार देता येईल.

८) मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक जे पालिकेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत त्यांना थेट संपर्क साधून खड्ड्यांबाबत तक्रार करता येईल.

९) मुंबई महानगरात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. त्या - त्या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते, अश्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवावी अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT