Maharashtra Rain: पालघर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; अतिवृष्टीने आतापर्यंत ९९ मृत्यू

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी एकूण 14 NDRF टीम आणि 6 SDRF टीम तैनात करण्यात आले आहेत.
Maharashtra Rain Latest News, Orange Alert In Mumbai Today, Red Alert City In Maharashtra
Maharashtra Rain Latest News, Orange Alert In Mumbai Today, Red Alert City In MaharashtraSaam Tv
Published On

मुंबई: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसानं (Heavy Rain) थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान (IMD Mumbai) खात्याकडून पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीने राज्याभरात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला असून मालमत्तेचही मोठं नुकसान झालं आहे. (Maharashtra Rain Latest News)

हे देखील पाहा -

पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Orange Alert In Mumbai)

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी एकूण 14 NDRF टीम आणि 6 SDRF टीम तैनात करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 99 वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे 181 जनावरांचाही मृत्यू झाला आहे, तर 7,963 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान राज्यातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईनं यावर निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Red Alert City In Maharashtra)

Maharashtra Rain Latest News, Orange Alert In Mumbai Today, Red Alert City In Maharashtra
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे भाव पुन्हा घसरले; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? पाहा आजचा भाव

जिल्ह्याचे नाव NDRF/SDRF

मुंबई (कांजुरमार्ग 1, घाटकोपर 1) 2 एनडीआरएफ पथकं

पालघर 1 एनडीआरएफ पथक

रायगड- महाड 2 एनडीआरएफ पथकं

ठाणे 2 एनडीआरएफ पथकं

रत्नागिरी-चिपळूण 2 एनडीआरएफ पथकं

कोल्हापूर 2 एनडीआरएफ पथकं

सातारा 1 एनडीआरएफ पथक

सिंधुदुर्ग 1 एनडीआरएफ पथक

गडचिरोली 1 एनडीआरएफ पथक

एकूण 14 एनडीआरएफ पथकं तैनात

नांदेड 1 एसडीआरएफ पथक

गडचिरोली 2 एसडीआरएफ पथकं

नाशिक 1 एसडीआरएफ पथक

भंडारा 1 एसडीआरएफ पथक

नागपूर 1 एसडीआरएफ पथक

एकूण 6 एसडीआरएफ पथकं तैनात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com