Pune MPSC students protest suspended after 11 days : पुण्यात मागील ११ दिवसांपासून एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन अखेर मध्यरात्री स्थगित करण्यात आले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीने आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी हा विजय साजरा केला. चौकशी पूर्ण होईपर्यंत विवेक भीमनवार पदावर राहणार नाहीत. तर चौकशी समितीच्या सचिवपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती कऱण्यात आली. (Pune MPSC aspirants call off protest as Bhimanwar goes on leave till probe panel completes inquiry)
पुण्यातील या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मध्यरात्री विद्यार्थ्यांनी मोबाईल टॉर्च लावून आपला आनंद व्यक्त केला आणि "आम्ही गाढव नाही, वाघ आहोत, शिकार केली... हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे!" अशी जोरदार प्रतिक्रिया यावेळी विवेकानंद पाटील यांनी दिली.
मध्यरात्री पुण्यात नेमके काय घडले?
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असलेल्या MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. "जोपर्यंत तपास सुरू आहे, तोपर्यंत भीमनवार त्या पदावर नकोत," या विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले. पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश आहे.
मागण्या मान्य झाल्याची घोषणा झाल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एस एम जोशी पूल आणि शास्त्री रोडवर मोबाईलचे टॉर्च उजळून विजयाचा उत्सव साजरा केला.
५ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची रचना
तुकाराम मुंढे (प्रशासकीय अधिकारी तथा समितीचे सचिव)
दिलीप भोसले (उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश)
बीडी नाईक (अध्यक्ष)
लखमी गौतम (पोलीस अधिकारी)
गणेश पाटील
शासनासोबत झालेल्या करारातील ठळक मुद्दे:
औषध निरीक्षक, गट 'ब' कृषी पेपर, आणि पीएसआय (PSI) यांसारख्या सर्व वादग्रस्त व पेपरफुटी झालेल्या परीक्षांची सखोल चौकशी केली जाणार. आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व पोलीस गुन्हे मागे घेतले जाणार. आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या गट 'क' (Group C) परीक्षेच्या पदांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वक्तव्य:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत तोडगा काढला आहे. १०० टक्के मागण्यांवर सकारात्मक विचार केला जात असून, लवकरच तुमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही आयोजित केली जाईल.
विवेक भीमनवार यांची प्रतिक्रिया
“मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला नेहमी प्राधान्य दिले आहे. MPSC ची स्वायत्तता आणि विद्यार्थीहिताला माझे प्राधान्य राहिले आहे. ही चौकशी निष्पक्ष पार पडावी, म्हणून मी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे स्पष्टीकरण विवेक भीमनवार यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.