IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांवर आहे विनयभंगाचा गुन्हा; भालगाव ग्रामस्थांनी का दिला आंदोलनाचा इशारा?

IAS Pooja Khedkar Case Update : IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 2022 मध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

Sandeep Gawade

आएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आज पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांचं मूळगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव ग्रामस्थ या सर्व प्रकारावरून आक्रमक झाले आहेत. खेडकर कुटुंबियांची बदनामी थांबवा नाहीतर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये 2022 मध्ये दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 296/2022 असा या गुन्ह्याचा एफआयआर क्रमांक आहे. या गुन्ह्यात दिलीप खेडकर यांच्यावर भारतीय दंड संहिता 1960 कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही हा न्यायप्रविष्ठ असून याबाबत दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याचा उल्लेख केलेला आहे.

पूजा खेडकर या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील आहेत. आता भालगावमधील ग्रामस्थ खेडकर कुटुंबियांवर सुरू असलेल्या आरोपांवरून आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिलं आहे. जर खेडकर कुटुंबियांच्या बाबत सुरू असलेली नाहक बदनामी थांबवली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मनोरमा खेडकर या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील माजी सरपंच आहेत. त्या सरपंच असताना गावाचा विकास करून कायपालट केला आहे. मात्र खेडकर कुटुंबियांची सध्या नाहक बदनामी सुरू असून ही बदनामी थांबविण्यात यावी, अन्यथा भालगाव पासून ते मुंबईपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच गावातील एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT