IAS Pooja Khedkar: वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या, आता ACB करणार चौकशी

Pooja Khedkar And Family Problems Increased: पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आला आहे. आता याप्रकरणी खेडकर कुटुंबीयांची एसीबी चौकशी करणार आहे.
IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आता एसीबी करणार चौकशी
IAS Pooja Khedkar, Deelip Khedkar, Manorama Khedkar,Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची पुणे लाचलुचपत विभाग म्हणजेच एसीबी चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबीयांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आला आहे. याचसंदर्भात आता या खेडकर कुटुंबीयांची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांचे आई-वडील सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या कुटुंबाची एसीबीमार्फत चौकशी होणार आहे. आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. दिलीप खेडेकर यांनी बेकायदेशिर मार्गाने कोट्यवधीची माया जमवली असल्याचा लाच लुचपत विभागाला संशय आहे.

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आता एसीबी करणार चौकशी
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांची उलट गिनती; ओबीसीतून नॉन क्रिमीलेअर प्रकरणाची होणार चौकशी

दिलीप खेडेकर यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे. त्यामुळे आता खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आता एसीबी करणार चौकशी
Pooja Khedkar News : पूजा खेडकरचं ओबीसी प्रमाणपत्र, कुटुंबीयांचं उत्पन्न, सगळंच निघणार

सरकारने मंगळवारी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केले. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आता एसीबी करणार चौकशी
Pune News : आधी केली दारू पार्टी, नंतर नशेत घेतला गळफास; अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येने पुणे हादरलं

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह केल्यामुळे चर्चेत आल्या. त्यानंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं. रोज पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन धक्कादायक अपडेट्स समोर येत आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांना चौकशीसाठी मसूरीला बोलावण्यात आले आहे.

IAS Pooja Khedkar: खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आता एसीबी करणार चौकशी
Pune Double Decker Bus: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पीएमपीच्या ताफ्यात येणार आलिशान 'डबल डेकर' बस; अशा असतील खास सुविधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com