भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. त्यातच आता खेडकर कुटुंबीय पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इन्कम टॅक्सच्या रडारवर आलंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या अहवालानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीने पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावलाय. त्यामुळे पूजा खेडकरचं काऊंट डाऊन सुरू झालंय की काय अशी चर्चा सुरू झालीय.
पूजा खेडकरांची उलट गिनती
22 कोटींची मालकीण असतानाही ओबीसीतून नॉन क्रिमीलेअर प्रकरणाची चौकशी
वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांग असल्याचे वेगवेगळे प्रमाणपत्रं सादर
नाव बदलून 11 वेळा UPSCची परीक्षा
MBBS केलेल्या महाविद्यालयात शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर
खेडकर कुटुंबीयांचं उत्पन्न शोधण्यासाठी इन्कम टॅक्स सरसावलं
पूजा खेडकरांच्या वडिलांचे आयकर रेकॉर्ड तपासले जाणार
अहमदनगरचे जिल्हाधिकारी खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाचा अहवाल केंद्राला पाठवणार
खासगी गाडीवर लाल दिवा, आईची शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी रश्मी शुक्लांनी मागवला अहवाल
तर दुसरीकडे वादग्रस्त पूजा खेडकरांची वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिका-यांनी तब्बल तीन तास कसून चौकशी केली. मात्र पूजा खेडकर यांनी चौकशी झाली नसल्याचा दावा केला. माहिती द्यायची होती म्हणून आपणच पोलिसांना बोलावल्याचा दावा त्यांनी केला.
साम टीव्हीनं पूजा खेडकरांचे नवेनवे प्रताप बाहेर काढल्यामुळे पूजा आणि त्यांचे कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. सरकारने जिल्हा प्रशिक्षणाला ब्रेक लावल्यामुळे पूजा खेडकर मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची केंद्रानं गंभीर दखल घेतलीय. त्यामुळे केंद्र सरकार पूजा खेडकरांवर कडक कारवाई करणार की त्यांची सेवाच संपुष्टात आणणार याचं काऊंट डाऊन सुरू झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.