IAS Pooja Khedkar Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या आईनंतर भावाचा प्रताप; सोसायटीतील सुरक्षारक्षक, जिम इन्स्ट्रक्टरला मारहाण केल्याचा आरोप

IAS Pooja Khedkar News Update: आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांच्या भावाचा कारनामा आता समोर आला आहे. पूजा खेडकर यांच्या भावाने सोसायटीच्या जीमधील इन्स्ट्रक्टर, सोसायटीचे सुरक्षारक्षक यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर याना अलीकडेच महाडमधील लॉजमधून पोलिसांनी अटक केली आहे. जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक दाखविल्याचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता त्यांचा भावाचा कारनामाही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर आणि त्यांच्या मुलाची ते राहत असलेल्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील दबंगिरीच्या घटना समोर आल्या आहेत. खेडकर पिता-पुत्राने ⁠सोसायटीच्या जीमधील इन्स्ट्रक्टर, सोसायटीचे सुरक्षारक्षक यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नॅशनल सोसायटीच्या साहित्याची तोडफोड आणि सोसायटीच्या संपत्तीचे नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

सोसायटी आणि जिम यांच्याकडून दिलीप खेडकर यांच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. ⁠जिम इन्स्ट्रक्टरकडून 2017 मध्ये मारहाणीची तक्रार देण्यात आली होती. तर सोसायटीने दिलीप खेडकर यांनी सुरक्षारक्षकाला मारहान केल्याचे आणि सोसायटीच्या संपत्तीचे नुकसान केल्याची तक्रार 2020 मध्ये दिली होती.

मारहाणी नंतर तक्रारीला वैद्यकीय प्रमाणपत्र देखील जोडण्यात आलं होतं. ⁠मात्र चतुर्शिंगी पोलिसांनी दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती आहे. मात्र आता हे प्रकरण पुन्हा नव्याने समोर आल्यानंतर याप्रकरणी कारवाई होते का? हे येत्या काही दिवसात कळेल.

पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं: विजय वडेट्टीवार

पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं. तसाच प्रकार राज्यात देखील एमपीएससीच्या बाबतीत घडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

Maharashtra News Live Update: माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी

New Labour Law: तुमचा पगार वाढणार की कमी होणार? नवीन कामगार कायद्याचा कर प्रणालीवर होणार परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT