IAS Tukaram Mundhe Latest News Saam TV
मुंबई/पुणे

IAS Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! १६ वर्षांत २० पेक्षा अधिक बदल्या...

IAS Tukaram Mundhe Latest News: आज, मंगळवारी राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

Tukaram Mundhe News: डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आज, मंगळवारी राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कारभार देण्यात आलेला नाही. (IAS Tukaram Mundhe Latest News)

तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या १६ वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंढेंची २० पेक्षा जास्त वेळा बदली (Transfer) करण्यात आली. तुकाराम मुंढे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जातात. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्यांना आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला होता.

तुकाराम मुंढे यांच्यासह एकूण सहा भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे:

०१. श्रीमती भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.

०२. श्री व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.

०३. श्रीमती सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.

०४. एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.

०५. श्री एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.

०६. श्री तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली - नियुक्ती प्रतीक्षाधिन.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT