कडव्या मराठी आणि हिंदुत्ववादी घराण्यात माझा जन्म झालाय, मी माझ्या भुमिकेवर ठाम Saam Tv News
मुंबई/पुणे

कडव्या मराठी आणि हिंदुत्ववादी घराण्यात माझा जन्म झालाय, मी माझ्या भुमिकेवर ठाम

कुणाच्याही घरी जाताना आपण त्याला जात विचारुन जात नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विकासाचा मुद्द्यावर पंतप्रधान पदी निवडून आले. जातीपातीच्या (Caste) आणि धर्माच्या (Religion) मुद्द्यावर नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात. पण राज्यात जातीपातीचं राजकारण (Politics) तयार करण्यात येत आहे. मी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची मुलाखत घेतल्यानंतर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण कडव्या मराठी आणि कडव्या हिंदुत्ववादी घराण्यात माझा जन्म झालाय. हिंदुत्ववादी संस्कार माझ्यावर कायम आहेत आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. अशा शब्दांत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

हे देखील पहा-

राज ठाकरे आज पाचव्यांदा पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली भुमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. इतकेच नव्हे तर, बाबासाहेब पुरंदरेंकडे मी इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही. शरद पवार साहेबांकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी जाताना आपण त्याला जात विचारुन जात नाही. त्याच प्रमाणे आपल्याला वॉर्डनिहाय आरक्षण नको, यात फक्त स्त्री आणि पुरुषांचे आरक्षण असावे. पण यासा विरोध कसा करणार, वर जे ठरवलं जातं तेच करावं लागतं.

मी काय वाचलं आणि वाचतो हे मला आणि माझ्या पक्षाला माहित आहे, मला मोजण्याचा प्रयत्न करु नये. बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते सिद्ध कारावं. ५० साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं, पण हे सर्व ठरवून केलेल राजकारण आहे, असा आरोपही राज यांनी यावेळी केला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

SCROLL FOR NEXT