मी राज्यपाल आणि महाविकास आघाडीचा प्रवक्ता नव्हे - चंद्रकांत पाटील Saam Tv
मुंबई/पुणे

मी राज्यपाल आणि महाविकास आघाडीचा प्रवक्ता नव्हे - चंद्रकांत पाटील

' राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांनी रिपोर्ट लिहायचा असतो मी त्यावर काही बोलणार नाही'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडी संघर्ष हे बोलायला मी दोघांचाही प्रवक्ता नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष निवडणूक रखडली असून या निवडणूकीमधील अडथळे काही दुर होताना दिसत नाहीत. त्यामुळे या प्रश्नांवरती आता कोणी काहीच बोलायला तयार नसल्याचं पाटील यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. (I am not the governor and spokesperson of MVA - Chandrakant Patil)

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय कार्यक्रम पत्रिकेवरती नसल्याचही पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांनी रिपोर्ट लिहायचा असतो मी त्यावर काही बोलणार नाही असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

काल नितेश राणेंच्या (Nitesh Rane) निलंबनासाठी प्रयत्न केले जात होते. नितेश राणेंवर अटकेचा प्रश्न मनमानी नाही तर काय ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच 12 आमदारांचे देखील या सरकारने निलंबन केले होते ते देखील त्यांच्या मनानुसारच कारण निलंबन हे प्रोसेस नुसार होते पण 12 आमदारांचे कोणतेही फुटेज नसताना निलंबन केले असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT