सुशांत सावंत
नारायण राणे नंतर आता मुंबई पालिकेच्या रडारवर भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) आहेत. अनधिकृत बांधकामाच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेने (BMC) यापुर्वी कंबोज यांना नोटीस पाठवली होती, त्यानुसार आज मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यात येणार आहे. दोन दिवस आधी पूर्व सूचना देणारी नोटीस (Notice) पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यलयाने, कंबोज रहात असलेल्या इमारतीच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवली होती. पालिकेची नोटीस आल्यानंतर मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे.
ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कंबोज म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार मी तुम्हाला घाबरणार नाही. तुम्ही कितीही खोट्या केसेस टाका किंवा नोटीसा पाठवा, महाविकास आघाडीविरोधात माझा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.