pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

Pune News update : सासूपासून वेगळं राहण्याचा हट्ट बायकोने केला. बायकोच्या याच हट्टाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

पुणे : घरात सतत कौटुंबीक वाद, पत्नीची वेगळे राहण्याची मागणी आणि पोलिसांत जाऊन केलेल्या तक्रारींना कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील येरवड्यातील तरुणाने टोकाचं पाऊस उचललं आहे. या प्रकरणी मृत पत्नीसह तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. २४ वर्षीय तरुणाने केलेल्या आत्महत्येने येरवडा भागात खळबळ उडाली आहे.

अक्षय विजय साळवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर तरुणाच्या ५२ वर्षीय आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अक्षयची पत्नी (वय २४) आणि तिच्या आईविरुद्ध (मूळ रा. गेवराई, जि. बीड) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयची पत्नी ही लग्नानंतर सातत्याने वेगळे राहण्याची मागणी करत होती. तसेच पत्नी नवऱ्याच्या विरोधात वारंवार विनाकारण पोलिसांकडे खोट्या तक्रारी करायची. आत्महत्येच्या आधी रात्री फोनवर अक्षयने आईला पत्नीशी पुन्हा भांडण झाल्याचे सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी सकाळी अक्षयने घरात आयुष्य संपवलं.

बायकोच्या सततच्या वादाला कंटाळूनच मुलाने टोकाचा निर्णय घेतल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. अक्षयनेही आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली. त्यात त्याने पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर यांची आत्महत्या, दोघांना अटक

नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या प्रकरणात नागपूर पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी दोन आरोपीला बेड्या ठोकल्यात. त्यामधील एका आरोपीचं नाव राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते शरद मैंद असे आहे. पोलिसांच्या कारवाईने विदर्भाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

Pune Crime : पुण्यात शिक्षक झाला हैवान! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् अत्याचार केला

GK : भारतातील पहिली धावणारी ट्रेन माहितेय का? जाणून घ्या

'तुझ्यासाठी बायकोची हत्या' डॉक्टर पत्नीच्या मृत्यूनंतर नवऱ्याचा कारनामा, अनेक मुलींना लग्नासाठी प्रोपोजल अन्..

SCROLL FOR NEXT