HSC Board Result Today 25 May: राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार या कडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर आता बारावीचा निकाल आज (25 मे) दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. (Latest Marathi News)
यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. त्यामुळे आता लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले आहे.(Latest News Update)
निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
कुठे पाहता येईल निकाल?
बारावीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.
यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला कळेल. विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.
SMS निकाल कसा पाहाल?
विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.