Congress Political News Saam tv
मुंबई/पुणे

Congress Meeting : काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीला ४५ पैकी किती आमदार गैरहजर?, नावे आली समोर

Maharashtra Political News : अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

प्रविण वाकचौरे

सुनील काळे | मुंबई

Mumbai News :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे.

काही आमदारांना आपण गैरहजर राहण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवलं आहे. तर काही काही आमदार नॉट रिचेबल आहेत. काँग्रेसचे ४५ आमदारांपैकी ७ आमदार गैरहजर आहेत.

कोणते आमदार गैरहजर आहेत?

  • मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण समर्थक आहेत. हंबर्डेंच्या घरी लग्नकार्य आहे त्यामुळे ते बैठकील येणार नाहीत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

  • माधवराव जवळगेकर हे देखील अशोक चव्हाण समर्थक आहेत. तेही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येणार नाहीत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

  • जितेश अंतापुरकर हेही अशोक चव्हाण समर्थक आहेत. ते देखील आलेले नाहीत.

  • अमित देशमुख देशमुख देखील बैठकीला पोहोचले नाहीत.

  • केसी पाडवी देखील बैठकीला आलेले नाहीत. ते देखील लग्नकार्यामुळे येणार नसल्याची माहिती आहे.

  • संग्राम थोपटे आणि सुलभा खोडके हे देखील वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येणार नाहीत.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस आमदारांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसचं लोणावळा येथे दोन दिवसीय शिबीर आहे. अशातच राज्यसभेची निवडणूक प्रक्रियेचा फॉर्म भरणे आहे. त्यानंतर आम्ही जाणार आहोत. अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांनी न येण्याबाबतची कारणे आम्हाला कळवली आहेत. मी आणि बाळासाहेब थोरात यांचं सर्वांशी बोलणं झालं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT