Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News : पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकनं १० ते १२ वाहनांना उडवलं

पुण्यात अपघातांची मालिका सुरूच; वडगाव पुलावर भीषण अपघात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Vadgaon Bridge Accident : पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वडगाव पुलावर मोठा अपघात झाला आहे. मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने समोर असलेल्या दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे.

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काही जण किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे पाहयला मिळाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ महिला जखमी झाल्या आहेत. 

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील भूमकर पुलाजवळ मोठा अपघात

दरम्यान, पुण्यात २ दिवसांपूर्वी नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेला कंटनेर चार वाहनांना धडकल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात २ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने समोर असणाऱ्या दोन चारचाकी , एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघात (Accident) झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Fare Hike : रेल्वेने तिकीट दर वाढवले! स्लीपर, AC ते नॉन एसीचा प्रवास महागला; जाणून घ्या नवीन किंमत

Badlapur : बदलापूरचा आश्चर्याचा धक्का देणारा निकाल; शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त; नगराध्यक्ष आणि सत्ताही भाजपची

Amravati Election: जनतेचा स्पष्ट कौल! अमरावतीत काँग्रेसची सरशी; मतदारांनी भाजप नाकारले, खासदार म्हणाले...

Cooking Tips : तांदूळ, डाळ, बटाटे शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या?

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

SCROLL FOR NEXT