Mantralaya issued Guidelines: saam tV
मुंबई/पुणे

Mantralaya Guidelines: मंत्रालयात होणारे आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी गृहविभाग अ‍ॅक्शन मोडवर; जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Mantralaya issued Guidelines: मुंबईतल्या मंत्रालयामध्ये वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्नावर आळा घालण्यासाठी गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Ministry Departments Guidelines:

शिक्षक भरती करावी या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. त्यानंतर गृहविभाग अ‍ॅक्शन मोड आले आहे. मुंबईतल्या मंत्रालयामध्ये वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्नावर आळा घालण्यासाठी गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलीय. मंत्रालयात येणाऱ्या येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तसेच मंत्रालयात येणाऱ्या विजिटरसाठी गार्डन गेट येथे अद्यावत सुरक्षा तपासणी कक्ष केले जाणार आहे.(Latest Politics News)

मागील महिन्यातही अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. आता बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने शिक्षक भरती करावी या मागणीसाठी सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केलं. यानंतर गृहविभाग अ‍ॅक्शन मोड आली असून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या सुचनेनुसार, प्रत्येक व्हिजिटरसाठी पास घेणं आवश्यक केलं आहे. मंत्रालयात येणाऱ्यांसाठी १५ दिवसात ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आलेत. मंत्रालयाच्या आतील आणि बाह्य परिसराची सीसीटीव्ही मार्फत सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. संरक्षक जाळी ओलांडून प्रवेशाचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत अलर्ट संदेश देणारी कार्यप्रणाली बसवण्यात येणार आहे.

ही यंत्रणा एक महिन्यात कार्यान्वित करण्यासंबंधी पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा विभागाला सूचना देण्यात आल्यात. मंत्रालयाच्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये खिडक्यांमधून किंवा प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागांमधून उडी मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा ठिकाणी अदृश्य दोर (InvisibleSteel Ropes) लावण्यात येणार आहेत. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना (RFID) स्वरुपाचे प्रवेश पत्रिका देण्यात येणार आहेत. जोपर्यंत (RFID)स्वरुपाचे प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही सुरू होत नाही, तोपर्यंत मंत्रालय सुरक्षा विभागामार्फत मंत्रालयमधील प्रत्येक मजल्यासाठी कलर कोड पत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मंत्रालय सुरक्षेसाठी कार्यन्वित असलेली ड्रोन यंत्रणा सुस्थितीत ठेण्याबाबत सूचनाही गृह विभागाने दिल्या आहेत. तसेच वारंवार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्यांची कारणांची यादीदेखील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहे. याचबरोबर मंत्री आणि सचिवांच्याच गाड्यांना प्रवेश राहणार आहे. तर खासगी गाड्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. मंत्रालयामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ५ हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावे, याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आलाय. तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतर भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना मंत्रालयात थांबू दिले जाणार नाहीये. याचबरोबर मंत्रालयात बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास यापुढे मनाई असणार आहे. मात्र भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना घरून जेवणाचे डबे आणता येणार आहेत.

मंत्रालयात येणाऱ्यांसाठी काय आहेत सूचना

  • भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना घरून जेवणाचे डबे आणता येणार, पण बाहेरील खाद्यपदार्थ आणता येणार नाही.

  • खासगी गाड्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

  • प्रत्येक व्हिजिटरसाठी पास घेणं आवश्यक

  • कार्यालयीन वेळेनंतर भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना थांबता येणार नाही.

  • मंत्रालय परिसरात पाळीव प्राण्यांना प्रतिबंध असणार आहे.

  • मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्यांना फक्त १० हजार पेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात आणता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : १ नोव्हेंबरला ६ राशींचं नशीब चमकणार! कोणाला मिळणार गुड न्यूज? वाचा रविवारचे राशीभविष्य

कर्मचाऱ्यांची दिवाळी 'सुपरफास्ट'; मालकाकडून 4 कोटींची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट

१७ आमदारांच्या बैठकीनंतर बंडाच्या चर्चेला उधाण; इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष फुटणार?

महिलांसाठी मोठी बातमी! राज्यातील लोकप्रिय योजनेच्या नियमात बदल; अदिती तटकरेंची घोषणा

रेल्वे स्टेशनवर तरुणांची स्टंटबाजी, सोशल मीडियावर लाईक्ससाठी जीवघेणा खेळ

SCROLL FOR NEXT