Palghar Rain, Holiday, School, Palghar Rain Updates
Palghar Rain, Holiday, School, Palghar Rain Updates  Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात ग्रामीणसह शहरी भागातील शाळांना सुट्टी जाहीर

रुपेश पाटील

पालघर : पालघर (palghar) जिल्ह्यातील सर्व शाळांना (schools) उद्या (गुरुवार, ता 14 जुलै) सुट्टी (holiday) जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी काढलेल्या आदेशात उद्या ग्रामीणसह शहरी भागातील सर्व शाळांना उद्या सुट्टी राहील असे नमूद केले आहे. (Palghar School Holiday)

पालघर जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. बहुतांश ठिकाणी दरड काेसळण्याचे प्रकार घडले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाले वाघोबा खिंड येथे आज दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावर वाहतुक काेंडी झाली हाेती. नांदगाव येथे पाणी भरल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

याबराेबरच वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसल्याने पालघर मधील सोमटा येथील एक घर काेसळलं. परशुराम हाडळ यांच्या मालकीच्या घराची भिंत जमीनदोस्त झाली. ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घरातील सर्वजण बाहेर पडल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये सलग पाचव्या दिवशी ही पावसाची दमदार हजेरी कायम आहे. त्यामुळे आता भर पावसात रहायचं कुठे असा प्रश्न हाडळ कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस पड़त आहे. येथील नदी नाल्यांना मोठा पुर आला आहे. अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली आहेत. नागझरी मासवनला जोडनाणा-या नागझरी येथील पुल पाण्यखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तूटला आहे. दरम्यान पावसाचा जाेर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने उद्या (गुरुवार) शाळांना सुटी जाहीर केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT