Kalyan Traffic Police Awareness News प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

फलक धरा अन्यथा ५०० रु. भरा; जनजागृती करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची भन्नाट आयडिया

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याणात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची जनजागृती करण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) जबरदस्त आयडिया शोधली आहे. वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांनाच पोलिसांनी वाहतूकीचे नियम शिकवण्यासाठी भाग पाडलं आहे. कल्याणच्या (Kalyan) छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुर्गाडी किल्ल्याजवळ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना हातात फलक धरून जनजागृती (Awareness) करण्यास सांगितले गेले. जनजागृती करणारे फलक १५ मिनिटे हातात धरा किंवा ५०० रुपये दंड भरा अशी अट घालत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली. (Hold the board otherwise give 500 rupees penalty The idea of the traffic police to create awareness in kalyan)

हे देखील पाहा -

वाहनचालकांकडून सर्रासपणे वाहतूकचे नियम मोडले जात आहेत. यामध्ये लायसन्स न बाळगणे, सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळेच आज कल्याण दुर्गाडी किल्ल्याजवळ अपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना हातात फलक धरून वाहतूक कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन तरडे यांच्याकडून समुपदेशन करत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: आरक्षणासाठी एल्गार! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड, धाराशिव जिल्हा बंद; रविवारी पुणे, परभणी 'जिल्हा बंद'ची हाक

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT