Shivaji Park Saam TV
मुंबई/पुणे

देशातील सर्वात भव्य राष्ट्रध्वज शिवाजी पार्कमध्ये उभारा; राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाण असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे साक्षीदार आहे.'

जयश्री मोरे

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) ही देशव्यापी मोहीम राबविली जात असतानाच, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी एक महत्त्वाची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. (Azadi Ka Amrit Mahotsav)

दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे देशभरातील सर्वांत भव्य असा राष्ट्रध्वज उभारावा, अशी लेखी मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यंत्र्यांकडे केली आहे. शेवाळे यांनी सध्या सुरू असलेल्या ' हर घर तिरंगा' अभियानाची प्रशंसा करत सार्वजनिक ठिकाणी २४ तास राष्ट्रध्वज (National Flag) लावण्याबाबत केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या धोरणानुसार देशभरात अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज उभारले जात असल्याची बाब आपल्या निवेदनात नमूद केली आहे.

पाहा व्हिडीओ -

यापुढे त्यांनी लिहिले आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाण असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे साक्षीदार आहे. या ठिकाणी दरवर्षी काही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो नागरिक शिवाजी पार्क येथे भेट देत असतात.

त्यामुळे, अशा महत्वपूर्ण ठिकाणी भव्य स्वरूपात देशभरातील सर्वांत मोठा राष्ट्रध्वज उभारावा. वास्तविक, खासदार शेवाळे यांच्याकडून गेल्या काही वर्षांपूर्वी पासून ही मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. अशा परिस्थितीत या विषयाची दखल घेऊन तातडीने संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT