Huge potholes and damaged roads in Hinjewadi IT Park causing severe traffic congestion and risking lives of daily commuters. saam tv
मुंबई/पुणे

देशातील नामांकित आयटी हब खड्ड्यात, पुण्यातील हिंजवडी IT पार्कला खड्ड्यांचा सापळा

Hinjewadi It Park Pothole Crisis Pune Traffic Chaos: रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका देशातील नामांकित आयटी हबला बसतोय. आयटी कर्मचाऱ्यांना ऑफिसला जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. रस्त्यांची चाळण होण्यामागे बांधकाम व्यावसायिकांचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यांची पार दुरवस्था झालीये. राज्यातील नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत असताना देशातील नामांकित आयटी हबला वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालीये. हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. खराब अरुंद रस्ते आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागलीये. नियमित कर भरूनही अशा जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

इतकंच नव्हे तर हिंजवडीजवळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम व्यावसाय़िकानं बेकायदा खोदकाम करून नुकसान केल्याचा आरोप आयटी फोरमनं केलाय. तसंच, रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या संबंधित व्यावसायिकावर कारवाईची मागणीही आयटी फोरमनं केलीये.

आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेलेत. याच खड्ड्यांमुळे हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास जीवघेणा ठरू लागलाय. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे देशातील नामांकित आयटी हब असलेल्या पुणे शहराची मात्र जगभरात नाचक्की होतेय. दोन वर्षांपूर्वी अशाच खड्ड्यांमुळे हिंजवडीतल्या अनेक कंपन्यांनी पुण्यातून स्थलांतर केलं होतं. मात्र प्रशासनानं यातून काहीही धडा घेतलेला दिसत नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT