Hinjewadi Bus Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Hinjewadi Horror: १२ जण कामाला निघाले, कंपनीत पोहचण्याआधीच चौघांना आगीनं गिळलं, फक्त सांगाडे उरले, चालकाने सांगितला थरार

Hinjewadi Bus Fire: हिंजवडीमध्ये आज सकाळी ८ च्या सुमारास कामावर निघालेल्या कामगाराच्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली. या आगीमध्ये होळपळून चौघांचा मृत्यू झाला तर एक दोघे गंभीर जखमी झाले.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपर-चिंचवडमधील हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागून त्यामध्ये होरपळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोघे जण गंभीर जखमी झाले. राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज वनमध्ये आज सकाळी ही घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलला आग कशी लागली यामागचे कारण समोर आले आहे. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. या टेम्पो ट्रॅव्हलच्या चालकाने या घटनेचा थरार सांगितला.

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज वन येथील डसॉल्ट सिस्टीमजवळ व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ट्रॅव्हलर बसला आज आठच्या सुमारास सकाळी अचानक आग लागली. या आगीत चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण १२ कर्मचारी प्रवास करत होते. हिंजवडी फेज वनमध्ये येताच अचानक चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि बसमध्ये पुढे बसलेले कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र टेम्पो ट्रॅव्हलरचा मागचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे सहा जणांना बाहेर पडता आले नाही. यामधील चौघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

जखमींना हिंजवडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेमध्ये सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (वय ५८, रा. नऱ्हे), गुरूदास लोकरे (वय ४०, रा. हनुमान नगर, कोथरूड), राजू चव्हाण (वय ४०, वडगाव धायरी) या चौघांचा मृत्यू झाला. या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या आगीमध्ये चालक जनार्दन हुंबर्डेकर (वय ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (वय. ३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (वय. ५२, रा. कोथरूड) हे जखमी झाले आहेत. या तिघांवर हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत तर प्रविण निकम (वय ३८), चंद्रकांत मलजी (वय ५२, रा. दोघेही कात्रज) यांना पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT