Raj Thackeray | Anand Dave Saam TV
मुंबई/पुणे

'राज ठाकरे सेक्युलर जननायक', हिंदू महासंघाची बोचरी टीका; पाहा Video

मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल सांगत मशिदीवरील भोंगे आधी मग मंदिरावरील भोंगे उतरवू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने सर्वाधिक कोंडी हिंदूच्या मंदिरांची झालीय असे मत हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी व्यक्त केले आहे.

मंदिरातील काकड आरती, गणेशोत्सव, शिवजयंती, गावच्या यात्रा, दहीहंडी असे सारेच उत्सव यामुळे धोक्यात येतील, भोंगे उतरवण्याने हिंदूंचे नुकसान होईल असंही ते म्हणाले, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंवर जास्त अन्याय होतोय, राज ठाकरे यांनी हा मुद्दा सामाजिक प्रश्न असल्याचे म्हटले आहे, वर्षभर साजरे होणाऱ्या हिंदूंच्या सणांवर अधिक गदा येऊ शकते त्यामुळे राज ठाकरे यांना हिंदू जननायक पेक्षा सेक्युलर जननायक म्हणायला हवे अशी खोचक टीका आनंद दवे यांनी केली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात कठोर भूमिका घेतली. चार तारखेपर्यंत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी मनसेच्या वतीने जिथे मशिदीवर अजान वाजत होती त्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न झाला. अनेक मनसे कार्यकर्तांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आज पहाटेपासूनच अटक सत्र सुरु आहे. काल राज्यातील बऱ्याच कार्यकर्तांना पोलिसांनी नोटीस देवून स्थानबद्ध केले होते. तरीही आज मनसे सैनिक रस्त्यावर उतरले आणि हनुमान चालीसा लावली. आज पुन्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून जिथे कुठे अनधिकृत भोंगे वाजतील तिथे हनुमान चालीसा लावाच असा आदेश दिला.

पोलीस फक्त आमच्या लोकांवर कारवाई करत आहेत. अनेक मशिदी अनधिकृत आहेत त्यावरील भोंगे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी काल पत्र लिहून आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली होती. भोंग्यांचा विषय हा धार्मीक नसून तो सामाजिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT