Hindi Marathi Row Mumbai Virar Viral video 
मुंबई/पुणे

मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतियाची मुजोरी; मराठी माणसाला भोजपुरी, हिंदी बोलण्याची केली सक्ती, Video व्हायरल

Hindi Marathi Row : मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी हा वादामुळे वातावरण तापले असतानाच आणखी एक व्हिडिओ समोर आला. विरारमधील व्हिडिओन मराठी माणसाच्या भावाना पुन्हा दुखावल्या आहेत. मुंबईमध्येच मराठी माणसाला हिंदी आणि भोजपुरी बोलण्याची सक्ती केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Namdeo Kumbhar

मनोज तांबे, विरार प्रतिनिधी

Hindi Marathi Row Mumbai Virar Viral video : राज्यात मराठी आणि हिंदी असा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे मनसैनिकांनी आज मोर्चा आयोजित केला आहे. राज्यात मराठी-हिंदी असा वाद सुरू असतानाच विरारमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये हिंदी व्यक्तीने मराठी माणसासोबत केलेली मुजोरी समोर आली आहे. विरार स्थानक परिसरात रिक्षा चालक आणि दुचाकीवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विरारमध्ये पुन्हा एकदा परप्रांतियाची मुजोरी समोर आली आहे. येथील परप्रांतीय रिक्षा चालकाने मराठी माणासालाच दमदाटी करत हिंदी बोलण्याची सक्ती केली. विरार स्टेशन परिसरात रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार तरुणाचा मराठी भाषेवरून पुन्हा नवा वाद झाला आहे. मुजोर रिक्षाचालक दमदाटी करत मराठीची गळचेपी करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रिक्षा चालकाने तरुणाला दमदाटी करत भोजपुरी , हिंदी बोलण्याची सक्ती केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. याप्रकरण समाजमाध्यमात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी हा वादामुळे वातावरण तापले असतानाच आणखी एक व्हिडिओ समोर आला. विरारमधील व्हिडिओन मराठी माणसाच्या भावाना पुन्हा दुखावल्या आहेत. मुंबईमध्येच मराठी माणसाला हिंदी आणि भोजपुरी बोलण्याची सक्ती केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी-मराठी असा वाद उफळला आहे. ठाकरेंच्या मनसे आणि शिवसेनेने हिंदी सक्तीच्या विरोधात आक्रमक पावले उचलली आहेत. दुसरीकडे मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्याला मनसैनिकांनी धडा शिकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् राज्यात वातावरण तापले. मराठीचा अपमान केल्यामुळे असे केल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी मोर्चा काढण्यात येत आहे, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्चाला कोणतीही परवानगी दिलेली नाही. पण मनसे मोर्चावर ठाम आहे, त्यामुळे मीरा भाईंदरमधील वातावरण तापले आहे. त्यातच विरारमधील हा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईमध्येच मराठी माणसासोबत दमदाटी होत असल्याचा व्हिडिओ वाऱख्यासारखा व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Guru Yog: ऑक्टोबर महिन्यात बनणार 2 राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

SCROLL FOR NEXT