CNG-PNG Price Saam Tv
मुंबई/पुणे

CNG Price Hike: ऐन गणेशोत्सवात नागरिकांना फटका; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये CNG च्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर

Pune CNG Price Today: पुण्यात आज रात्रीपासून सीएनजीचे नवीन दर लागू झाले आहेत.

Satish Kengar

ऐन गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किंमतीत 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी पुण्यात आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलोसाठी 85 रुपये द्यावे लागत होते.

आता नागरिकांना सीएनजी प्रतिकिलोसाठी 85.90 रुपये मोजावे लागतील. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. असं असलं तर पीएनजी दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या शहरांना सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) आंतरराष्ट्रीय नैसर्गिक वायू बाजारपेठेत वाढत्या किमतीमुळे दरवाढीची घोषणा केली. ही वाढ नाममात्र असली तरी सीएनजीची वाढती मागणी आणि आयात खर्च यामुळे ही वाढ झाली आहे.

सीएनजीच्या किंमतीत वाढ केल्यानंतर एमएनजीएलने म्हटलं आहे की, आजही पारंपारिक इंधनाला कमी खर्चिक पर्याय हा सीएनजीच आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे 49 टक्के बचत होते. तर डिझेलपेक्षा सीएनजी 27 टक्के स्वस्त आहे. पेट्रोल किंवा डिझेलऐवजी सीएनजी वापरताना रिक्षाचालकांना 29 टक्के बचतीचा फायदाही होतो.

दरम्यान, याआधी जुलैमध्येही सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये प्रतिकिलोने झाली होती. यानंतर सीएनजीची किंमत 85 रुपये प्रतिकिलो झाली होती. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून या पर्यावरणपूरक इंधनाकडे वळलेल्या वाहनचालकांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT