मुंबई शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. शहरात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणेने वर्तवलीय. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अंधेरी परिसरातून कुख्यात गुंड बिश्नोई गँगच्या ५ सदस्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून ७ पिस्तुलं, २१ काडतुसं, एक इंटरनेट डोंगल आणि एक मोबाईल सीमकार्ड जप्त करण्यात आलं होतं.
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी मुंबईतील एक उद्योगपती आणि अभिनेत्यावर हल्ला करण्याचा कट आखला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. त्याचदरम्यान आता मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आलीय.
सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी मुंबईत पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातलीय. उद्या ४ एप्रिल २०२५ पासून लागू ही बंदी लागू असणार आहे. दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करून दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांकडून वर्तवण्यात आलीय.
शहरातील VVIP व्यक्तींना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी हल्ला होण्याचीही शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी परिपत्रकात सांगितलं होतं. या अनुषंगाने पोलिसांनी या सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घातलीय.
मुंबई पोलिसांचे अधिकार क्षेत्र आणि डीसीपीच्या परवानगीशिवाय ड्रोन, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर वापरला गेल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.