Khambatki Ghat Traffic Jam Saam Tv
मुंबई/पुणे

Khambatki Ghat: खंबाटकी घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Khambatki Ghat Traffic Jam: पुण्यावरून साताराकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातील वाहतूक विस्कळित झाली आहे. घाटामध्ये ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

ख्रिसमससाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यावरून साताराकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातील वाहतूक विस्कळित झाली आहे. घाटामध्ये ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहने बंद पडल्यामुळे खंबाटकी घाट जाम झाला आहे. जवळपास एका तासापासून घाटात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या खांबाटकी घाटात आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्याहून सातारला जाताना खंबाटकी घाट हा एकेरी मार्ग आहे. घाटात गेल्यानंतर दोन वाहने रस्त्यावरून जाणं कठीण होतं. रस्त्यात एखादं वाहन बंद पडले तर इतर वाहनांची जाताना अडचण होते.

आज सकाळपासून घाटामध्ये जवळपास तीन ते चार वाहन काही अंतराने बंद पडल्यामुळे खंबाटकी घाट जाम जाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात सातारा, कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे आज सकाळीही छोटी वाहनं आणि अवजड वाहतूक बंद पडलेल्या गाड्या यामुळे घाट जाम झाला.

खंबाटकी घाटामध्ये जवळपास ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे घाटात पाहायला मिळाल्यामुळे वाहन चालकांना काही वेळ अडचण निर्माण झाली. खंबाटकी घाटातून जाताना गाड्याचा वेग यामुळे साहजिकच कमी होतो. त्यामुळे आज सकाळपासून खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एकाच ठिकाणी वाहनं थांबून राहिल्यामुळे लहान मुलं, महिला त्याचसोबत वयोवृद्ध नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठरलं! महाराष्ट्राला उद्या नवीन उपमुख्यमंत्री मिळणार, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी|VIDEO

विकेंडला प्रवाशांचे हाल होणार; मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

SCROLL FOR NEXT