Mumbai Local Train Rain Aleart Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं; लोकल सेवा विस्कळीत, रुळावर साचलं पाणी

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईसह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसाने सखल पाण्यात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. या पावसाचा फटका काही प्रमाणात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल (Local Train) सेवेलाही बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचत असल्याने लोकल 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरू आहे. रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साचल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. (Mumbai Rain Latest news)

सोमवारी दुपारपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. मंगळवारी सकाळी सुद्धा पावसाने आपली जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली. त्यामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले असून रेल्वे रुळावर सुद्धा पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी विलंब झाला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (Mumbai Lokal Latest News)

येत्या दोन ते तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याने एनडीआरएफच्या पाच तुकड्यांना मदतीसाठी सतर्क करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकणातही पावसाने दमदार बॅटिंग केली. कोकणात होत असलेला मुसळधार पाऊस बघता मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT