Heavy rainfall in mumbai Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Alert : मुसळधार पावसाने झोडपलं, मुंबईसह कोकणाला यलो अलर्ट

आयएमडीकडून मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे मुसळधार पावसाची संततधार (Heavy rainfall in mumbai) सुरुच असून परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला, सायन, मुलुंड, दादर, परळ परिसरात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे मध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा (Traffic in mumbai) झाला होता. तसेच वांद्रे कलानगर जंक्शन समोर असलेल्या रस्त्यावरही पाणी तुंबले होते. याच पार्श्वभूमीवर आयएमडीकडून (IMD) मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातही मुसळधार पावसाने धडाका घातल्याने तिथेही येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईच्या काही भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे

ठाण्यातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. शहरात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात डॉ. आंबेडकर रोडजवळील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सज्जाचा धोकादायक भाग पालिकेने निकामी केला आहे. मुसळधार पावसामुळं पाचपाखाडी येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहिय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT