Heatwave in Mumbai | Mumbai temperature Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबई - नवी मुंबईत उष्णतेची तीव्र लाट; तापमान आणखी वाढण्याची शक्यता...

Mumbai Temperature News: गुजरातच्या उत्तरेकडे येणाऱ्या उष्णता आणि दमट वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात उष्णतेची लाट आली आहे, असं होसाळीकर म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याची राजधानी मुंबईमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. मुंबईत उष्णतेची तीव्र लाट आली असून सकाळी ११ वाजता मुंबईचं तापमान ३४° C एवढं तापमान होतं. तर नवी मुंबईत (Navi Mumbai) पारा ३५° C वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत.

हे देखील पहा -

याबाबत हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलं की, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढचे दोन दिवस मुंबई आणि उत्तर कोकणात तापमान (Temperature) वाढलेलं असेल. काही ठिकणी उष्णतेच्या लाटेती शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागात दिवसा कमीत कमी ३७° C (37 degrees Celsius) तापमान असणं गरजेचं आहे. हा प्रभाव दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या उत्तरेकडे येणाऱ्या उष्णता आणि दमट वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात उष्णतेची लाट आली आहे, असं होसाळीकर म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

SCROLL FOR NEXT