Pune Tanker Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: रिव्हर्स घेताना अनर्थ घडला, टँकरखाली चिरडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Pune Tanker Accident: पुण्यात पाण्याच्या टँकरने चिरडल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. वारजे भागात ही घटना घडली. याप्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यात टँकरने दोन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. रिव्हर्स घेताना हा अनर्थ घडला. टँकर चालकाच्या लक्षात न आल्यामुळे चिमुकला टँकरच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणपती माथा परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात टँकरच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. टँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने हा अपघात घडला. पुण्यातील वारजे परिसरात ही घटना घडली. टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाला. वारजे पोलिस ठाण्यामध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली. वारजे पोलिसांनी टँकर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे परिसरामध्ये सायंकाळी पावणे आठच्या सुमारास एक पाण्याचा टँकर गणपती माथा, वारजे येथील एका सोसायटी मधील अरूंद गल्लीमध्ये पाणी टाकून परत येत असताना ही घटना घडली. चालकाने तेथील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि आजूबाजूचे नागरिक करत असलेल्या हातवाऱ्याकडे आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून टँकर बेदरकारपणे रिव्हर्स घेतला. त्यावेळी टँकरच्या मागच्या चाकाखाली २ वर्षाचा एक मुलगा सापडून त्याचा करूण अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून टँकर चालकाला अटक करण्यात आलेली आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करून बालकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहे. या घटनेनंतर चिमुकल्याच्या नातेवाईकांमध्ये आक्रोश केला. मध्यरात्री चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT