CM Eknath Shinde Narendra Modi Mumbai Speech
CM Eknath Shinde Narendra Modi Mumbai Speech Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : CM शिंदेंचं ते वाक्य ठाकरे गटाने हेरलं; निवडणूक आयोगासमोर VIDEO क्लिप दाखवणार!

Gangappa Pujari

Mumbai: शिवसेना आणि शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगात आज म्हणजेच 20 जानेवारीला निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने अँड कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. यावेळी ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी आयोगाकडे अधिकचा अडीच तास वेळ मागितला होता.

याबद्दल आता महत्वाची अपडेट समोर येत असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा आशय ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगासमोर सादर केला जाणार आहे. (Mumbai News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी बीकेसी मैदानावर सभाही घेण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या भाषणात "दावोसामध्ये मला तुम्ही मोदींसोबत आहात का असे विचारले, त्यावेळी मी त्यांना आम्ही मोदींचीच माणसे आहोत," असे उत्तर दिल्याचे सांगितले होते.

त्यांच्या याच वक्तव्याचा ठाकरे गटाचे वकील निवडणुक आयोगासमोर मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांकडून त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओही निवडणुक आयोगाला दाखवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण खटल्याचा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत, तर शिंदे गटाच्या वतीने अँड महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. या खटल्यात आज नक्की काय होणार, याकडे दोन्ही गटांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

16 आमदार

  • 13 विधानपरिषद

  • 05 लोकसभा खासदार

  • 03 राज्यसभा खासदार

  • 182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य

  • प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)

  • प्राथमिक सदस्य 20 लाख

  • एकूण कागदपत्र 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना

  • खासदार 13

  • आमदार 40

  • संघटनात्मक प्रतिनिधी 711

  • स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046

  • प्राथमिक सदस्य 4,48,318

  • शिवसेना राज्यप्रमुख 11

  • एकूण 4 लाख 51 हजार 139

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT