आरोग्य परीक्षा पेपरफुटी प्रकरण Saam Tv
मुंबई/पुणे

आरोग्य परीक्षा पेपरफुटी प्रकरण, एका एजंटसह दोघं ताब्यात

आरोग्य विभागाच्या गट 'क' पेपरफुटी प्रकरणातील एका एजंटसह दोन जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आरोग्य विभागाच्या गट 'क' पेपरफुटी प्रकरणातील एका एजंटसह दोन जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एजंट गायकवाड यांच्यासह दोघांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आरोपी असलेला संजय सानप याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी गायकवाड आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. (Health examination paper leak case two arrested by pune police)

दुसरीकडे, पुणे पोलिसांची (Pune Police) काही पथके दिल्ली येथे दाखल झाली आहेत. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा -

परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील - राजेश टोपे

आरोग्य भरतीतील परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुनः परीक्षेबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. इथून पुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करुन परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत कोणाकोणाला अटक?

टीईटी परीक्षा पेपर (TET Exam) फुटी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्यानंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या आहेत. आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे. जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा लायझिंग अधिकारी सौरभ त्रिपाठीला पुणे पोलिसांनी लखनऊमधून अटक केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT