आरोग्य भरती प्रवेश परिक्षा : पुन्हा गोंधळ- चुकीच्या प्रवेश पत्रांचे वितरण - Saam TV
मुंबई/पुणे

आरोग्य भरती प्रवेश परिक्षा : पुन्हा गोंधळ- चुकीच्या प्रवेश पत्रांचे वितरण

आरोग्यभरती परिक्षा प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चुकीचं प्रवेश पत्र मिळालेलं दिसत आहे

साम टिव्ही

प्राची कुलकर्णी, ब्युरो चीफ पुणे

पुणे : आरोग्यभरती परिक्षा प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चुकीचं प्रवेश पत्र मिळालेलं दिसत आहे. तर काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणची प्रवेशपत्र मिळाली आहेत.

आरोग्य विभागातल्या क आणि ड गटातल्या पदांच्या भरतीसाठी ही परिक्षा घेतली जात आहे.ब्लॅकलिस्ट असलेल्या खासगी कंपनी कडून ही परिक्षा घेतली जात आहे. गेल्या वेळी या प्रक्रियेत गोंधळ झाल्याने परिक्षा पुढे ढकलली गेली होती. २४ तारखेला ही परिक्षा होणार आहे. त्याची प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली आहे. पण त्यातही पुन्हा एकदा गोंधळ झालेला पहायला मिळत आहे.

आत्ता आरोग्य विभागाच्या परीक्षा चे प्रवेश पत्र उपलब्ध झाली आहेत. काही विध्यार्थ्यांना जे परीक्षा केंद्र टाकलं आहे ते नं मिळता दुसरचं मिळालं आहे. एकाचं वेळी दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पेपर आले आहेत. साम आणि सकाळने या प्रक्रियेतील गोंधळ समोर आणला होता. त्यानंतर ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला होता. पण पुन्हा एकदा या परिक्षांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाला आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

Farmer Scheme : फडणवीस सरकारकडून नव्या योजनेची घोषणा, 'या' शेतकऱ्यांना मिळणार २ लाख रुपये

SCROLL FOR NEXT