धक्कादायक : पत्नी मुलाला जखमी करुन स्वतःला संपवलं; कल्याणमधील 'त्या' मृतदेहाच गूढ उलगडलं SaamTV
मुंबई/पुणे

धक्कादायक : पत्नी मुलाला जखमी करुन स्वतःला संपवलं; कल्याणमधील 'त्या' मृतदेहाच गूढ उलगडलं

वडिलांनी आधी आम्हाला जखमी केलं त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवलं असल्याची खळबळजणक महिती मुलाने पोलिसांनां (Police) दिली.

प्रदीप भणगे

कल्याण :  कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील चिकनघर परिसरामध्ये असणाऱ्या निखिल हाईट्स या हाय प्रोफाइल सोसायटी मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सेवा निवृत्त मोटरमनचा मृतदेह आढळला आहे.

हे देखील पहा -

निखिल हाईट्स या सोसयटीमध्ये बनोरिया कुटुंब चौथ्या मजल्यावरती रहातात. मात्र काहीतरी कौटुंबिक वादातून प्रमोद बनोरिया सेवानिवृत्त मोटरमन यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवलं असल्याचं मृत प्रमोद यांचा मुलगा लोकेश याने पोलिसांना सांगितलं. सदर घटना ही रात्री घडली असल्य़ाचा पोलिसांचा अंदाज असून या घटनेबाबत पोलिसांनी जखमी लोकेशकडून चौकशी केली असता त्याने सांगितले, 'वडिलांनी आधी आम्हाला जखमी केलं त्यानंतर त्यांनी स्वतःला देखील संपवलं.' असल्याची खळबळजणक महिती त्याने पोलिसांनां (Police) दिली.

दरम्यान या संपुर्ण घटनेबाबत कल्याणचे DCP सचिन गुंजाळ आणि ACP उमेश माने पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला असल्याचे सांगितंल. तसेच ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र तपासानंतर या घटनेमधील तथ्य व काय ते समोर येईल. असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

SCROLL FOR NEXT