फेरीवाल्यांकडून मापात पाप! एका सतर्क नागरिकाने पकडली चोरी! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Vasai Virar : फेरीवाल्यांकडून मापात पाप! एका सतर्क नागरिकाने पकडली चोरी!

फेरीवाले रस्त्यावर उभे राहून विकत असलेल्या वस्तू मोजताना वजन काट्याच्या खाली अनेकवेळा धातूच्या चकत्या, लोहचुंबक, अथवा अधिक वजनाचे धातूचे भांडे वापरतात.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : वसई विरार मध्ये फेरीवाल्यांनी वसईकरांच्या तोंडाचा घास कडू करण्याचा प्रकार लावला आहे. फेरीवाले विकत असलेल्या भाजीपाला तसेच फळे यांच्या मापात पाप करत आहेत. खुलेआम वजन काट्यात फेरफार करून ग्राहकांना कमी वजनाच्या वस्तू विकत आहेत. अनेक वर्षापासून चालू असलेली ही फसवणूक आता एका सतर्क नागरिकाने समोर आणली आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात अनेक फेरीवाले अशा पद्धतीने ग्राहकांना फसवत आहेत.

हे देखील पहा :

नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात फेरीवाले नागरिकांची फसवणूक करत असताना , एका नागरिकाने फेरीवाल्यांची ही चोरी पकडली. फेरीवाले रस्त्यावर उभे राहून विकत असलेल्या वस्तू मोजताना वजन काट्याच्या खाली अनेकवेळा धातूच्या चकत्या, लोहचुंबक, अथवा अधिक वजनाचे धातूचे भांडे वापरतात.

तर, काही जण वस्तू गुंडाळून देताना हातचलाखीने पिशव्या बदलतात. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. नागरिक घाईत असल्याने ही चोरी पकडू शकत नाहीत. पण या फेरीवाल्यांवर कारवाई कण्यासाठी कोणतही प्रशासन पुढे येत नसल्याचे नागरिकांची ही फसवणूक अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे मापात पाप करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई कारावी अशी मागणी जोर धरत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT