मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिपावली पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर म्हणजेच उद्या ६ नोव्हेंबरला आपल्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यांचं हे पाच मजली घर म्हणजे एक आलिशान इमारत असून ही नवी इमारत त्यांचा सध्याचा बंगला कृष्णकुंज शेजारीच ही नवी इमारत आहे. (Have you seen Raj Thackeray's new house? Will enter the house on the occasion of Padva)
हे देखील पहा -
राज ठाकरेंनी या नव्या घराला अजून नाव दिलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते दादरमधील कृष्णकुंज या बंगल्यावर वास्तव्यास आहेत, त्यामुळे दादर आणि कृष्णकुंज हे जणू समीकरणचं बनलं आहे. आता राज ठाकरे आपल्या नव्या घराला काय नाव देणार याकडे मनसैनिकांच लक्ष लागलेलं आहे. या आलिशान इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत पक्षाचं कार्यालयही असेल. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. सोबतच या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. एकुणच राज ठाकरेंचं नवं घर सर्व सोयी-सुविधांनी युक्त असं असेल.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.