कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही- हसन मुश्रिफ Saam TV
मुंबई/पुणे

कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही- हसन मुश्रिफ

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हसन मुश्रिफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी कोल्हापूरात गेले होते. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेवून मुश्रिफांवर गंभीर आरोप केले त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हसन मुश्रिफ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याला जी माहिती दिली होती ती खोटी होती.

आज त्यांनी तिसरा घोटाळा बाहेर काढला, परंतु दुसऱ्या घोटाळ्याबाबत आज कुठलाच उल्लेख दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे अशी वक्तव्य करु नये म्हणून त्यांच्याबर बंदी आणण्यासाठी देखील दावा दाखल केला असल्याचं मुश्रिफ म्हणाले. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत मुश्रिफांचे जावाई आणि मुलावर देखील आरोप केले होते ते सर्व आरोप निषेधार्य असल्याचं मुश्रिफ म्हणाले.

मी २५ वर्ष झालं राजकारणात आहे प्रचंड मेहनत करुन आम्ही इथपर्यंत आलो आहोत त्यामुळे कुणिही उठावं आणि चिखलफेक करावी हे मी सहन करणार नसल्याचे मुश्रिफ म्हणाले. आजच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपाबाबत उत्तर देताना ते म्हणाले पंचायत समिती आणि राज्यभरातील CEOनी एक पत्र दिले होते त्यात अनेक तक्ररी होत्या की कंत्राटदार जीएसटी घेतात भरत नाही टीडीएस कापत नाहीत त्यावरुन माझ्या खात्याच्या अंडर मी त्याला मंजूरी दिली होती. त्यामुळे यासाठी काहीतरी युनिफार्म व्यवस्था असावी यासाठी तो निर्णय घेणयात आला होता. 1500 कोटीचा घोटाळा सोमय्या यांनी कुठून केला माहीत नाही असेही ते म्हणाले. पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांना सोमय्या जाणून बुजून टारगेट करत आहेत. त्यामुळे इथून पुढे मी त्यावर बोलणं बंद कऱणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT