Harvinder Singh Rinda was supplying arms to Naxals? Suspicion to investigation Agencies
Harvinder Singh Rinda was supplying arms to Naxals? Suspicion to investigation Agencies Saam Tv
मुंबई/पुणे

Harvinder Singh Rinda: रिंदा नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवायचा? तपास यंत्रणांना संशय

सूरज सावंत

मुंबई: खलिस्तानी दहशतवादी हरविंदर रिंदा (Harvinder Singh Rinda) नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हरियाणात (Hariyana) पकडलेल्या चार खलिस्तानी दहशतवाद्यांच्या (Terrorist) चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभावावा यासाठी रिंदाने देशातील मोठ्या व्यावसायिकांना लक्ष्य करून कोट्यावधी रुपये उकळले होते. तसेच स्फोटके (RDX) चा दोन वेळा खेपा नांदेड मार्गे झाल्याचे समोर आले होते. तपासात दोन्ही वेळा RDX हे नक्षल भागात पोहचवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. (Harvinder Singh Rinda was supplying arms to Naxals? Suspicion to investigation Agencies)

हे देखील पाहा -

चार खलिस्तानी दहशतवाद्यांचा ताबा महाराष्ट्र पोलीस घेणार

हरियाणामध्ये ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना (Khalistani terrorists) महाराष्ट्र पोलीस (Police) ताब्यात घेणार आहे. त्यांची चौकशी करुन पोलीस परतले आहेत. हरविंदर सिंग रिंदासाठी हे चारजण काम करत होते. रिंदा पाकिस्तानात (Pakistan) बसून भारतावर दहशतवादी हल्ला कारवाईचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. नक्षलवाद्यांकडून तेथे स्थानिक पोलिस आणि तपास यंत्रणांवर हल्ला करून मोठी हानी घडवण्याचा या मागील हेतू असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईसारख्या भागांवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे.

हरियाणातून चार दहशतवाद्यांना केली होती अटक

५ मे ला हरयाणाच्या करनालमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. करनालमधून चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यांच्याकडून तीन आयईडी बॉम्बही जप्त करण्यात आले होते. हे चारही संशयित दहशतवाद्यांचे महाराष्ट्रातील (Maharashtra) नांदेड कनेक्शन समोर आले होते. ते सर्व जण नांदेडला (Nanded) जात होते. त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. हे चौघेही आयईडी तेलंगणात पाठवणार होते. जिथे स्फोटकं नेण्यात येत होती, ते लोकेशन त्यांना पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी यापूर्वी दोन ठिकाणी आयईडी पाठवले आहेत, अशी माहितीही उघड झाली आहे. (Karnal's terrorist connection with Nanded)

ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून आणलेला शस्त्रसाठा

करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर अशी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. खलिस्तानी दहशतवादी रिंदा याने ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानहून फिरोजपूरमध्ये शस्त्र पाठवले होते. यातील तीन फिरोजपूर आणि एक लुधियानाचा रहिवासी आहे. मुख्य आरोपी असलेल्या दहशतवाद्याची (Terrorist) इतरांशी तुरुंगात ओळख झाली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

SCROLL FOR NEXT