मुळचा नांदेडचा तरुण रिंडा असा झाला दहशतवादी; जाणून घ्या

harvinder singh rinda News : Who is most wanted khalistani terrorist Harvinder Singh
Who is most wanted khalistani terrorist Harvinder Singh rinda
Who is most wanted khalistani terrorist Harvinder Singh rinda Saam Tv

नांदेड : मुळचा नांदेडचा (Nanded) असलेला दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा हा २०२० साली भारतातून फरार होऊन आयएसआयच्या संरक्षणात पाकिस्तानात लपून बसला आहे. सध्या पाकिस्तानात बसून भारताच्या विरोधात दहशतवादी (Terrorist) हल्ले करण्यासाठी सक्रिय झाला आहे. हाच रिंडा पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात वारंवार विस्फोटके पोहोचवत आहे. तसेच अनेक देशाच्या गुप्तचर संस्था सध्या रिंडाच्या मागावर आहेत. या रिंडाचे वडील चरण सिंह देखील महाराष्ट्रातील तुरुगांत कैद आहेत. हरियाणामध्ये (Hariyana) चार दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांचे रिंडा आणि नांदेड कनेक्शन उघड झालं. त्यामुळे दहशतवादी रिंडा अनेकांच्या चर्चेच्या मध्यस्थानी आला आहे. (Who is most wanted khalistani terrorist Harvinder Singh rinda )

हे देखील पाहा -

कोण आहे हरविंदर सिंह रिंडा ?

मिळालेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंह रिंडा याचं कुटुंब मुळचं पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील आहे. रिंडाचा जन्म नांदेडमधील आहे. त्याच्या वडिलाने १९७६ साली नांदेडमध्ये स्थलातंर केलं. त्यावेळी त्याचं वय ११ वर्ष होतं. त्यानं नांदेडच्या युनिव्हर्सल इंग्लिश शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या अठराव्या वर्षी त्यानं कौंटुबीक कारणावरून नातेवाईकाची हत्या केली होती. त्यानंतर पुढे नांदेडमध्ये काही व्यापाऱ्याच्या देखील हत्या केल्या होत्या. आजही त्याच्याविरोधात गुन्हे पोलिस स्थानकात नोंद आहेत. या विविध गुन्हांच्या आरोपाखाली रिंडा हा २०१५ सालापर्यंत तुरुंगात होता. पुढे रिंडा पंजाब विद्यापीठात शिकण्यासाठी आला होता. यावेळी तो विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाला. राजकारणात सक्रिय झाल्यावर त्याचे गुन्हेही वाढू लागले होते. २०१६ साली त्यानं स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या नेत्यांवर गोळीबार केला होता. त्यामुळं पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती.

पंजाब विद्यापीठातून पोहोचला थेट पाकिस्तानात

रिंडानं पंजाब विद्यापीठात गोळीबार केला. त्या गुन्ह्यामुळं रिंडा विद्यापीठाच्या बाहेर राहू लागला. त्याला विविध गुन्ह्यात दिलप्रीत सिंह बाबा आणि हरजिंदर सिंह यांची साथ होती. मोहालीमध्ये प्रसिद्ध गायक परमीश वर्मा यांच्या हत्या केल्यानंतर दिलप्रीत सिंह बाबा आणि रिंडा यांची साथ तुटली. त्यानंतर हरविंदर सिंह रिंडा नेपाळच्या मार्गातून पाकिस्तानात पळाला. पाकिस्तानात फरार होण्यासाठी त्यानं बनावट पासपोर्टचा वापर केला. सध्या रिंडा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संस्थेच्या संरक्षणात पाकिस्तानात आहे. पंजाब पोलिसांनी रिंडाला २०१७ साली पकडण्याचे प्रयत्न केले होते. त्यावेळी रिंडा हा बँगलोरमध्ये एका हॉटेलमध्ये पत्नीसोबत होता. त्याची खबर पंजाब पोलिसांनी बँगलोर पोलिसांना दिली होती. मात्र, रिंडा हॉटेलमधून पळण्यात यशस्वी ठरला. त्यावेळी पोलिसांनी पत्नीला पकडलं होतं. त्यानंतर आजही रिंडा पोलिसांच्या रडारवर आहे.

Who is most wanted khalistani terrorist Harvinder Singh rinda
Nanded: तरोडा नाक्यावरील पाच दुकाने जळून खाक; शेकडाे काेंबड्यांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी हरियाणामधील करनालमध्ये चार दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडे ७.५ किलो आरडीएक्स हस्तगत केले. हे चारही आरोपींचे रिंडा कनेक्शन उघड झाले आहे. या रिंडानं ड्रोनच्या माध्यामातून पाकिस्तानमधून फिरोजपूरला हत्यारं पाठवलं होती. त्या हत्याराच्या मदतीने मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. अनेक गुन्ह्यामुळं रिंडा हा पोलिसांच्या रडारवर आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com