Virar Bicycle Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Virar News: सायकल चालवताना अचानक हँडल तुटला, मुलगा गंभीर जखमी; घटनेचा धक्कादायक Video आला समोर

Latest News: हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे.

Priya More

चेतन इंगळे, विरार

Virar Latest News: विरारमध्ये (Virar) सायकलच्या विचित्र अपघातामध्ये 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सायकल चालवत असताना अचानक हँडल तुटल्याने ही घटना घडली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. जखमी झालेल्या मुलाला पुढील उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये (Hospital) हलवण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेला (Virar West) असलेल्या HDIL या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणारा 9 वर्षांचा मुलगा रविवारी आपल्या मित्रांसोबत सायकल चालवत होता. सायकल चालवत असताना अचानक हँडल तुटतो आणि हा मुलगा जमिनीवर कोसळतो. या अघातामध्ये मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मुलगा पडल्यानंतर आसपास असणाऱ्या नागरिकांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ही घटना सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

दरम्यान, शाळांना सुट्टी लागल्यामुळे लहान मुलं सध्या खेळण्यात दंग आहेत. अशावेळी आपली मुलं खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. या घटनेमुळे लहान मुलांना एकटं सोडू नये, ते खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्याचे आवाहने केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT