Pune Firing  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार

Pune Firing: पुण्यामध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गाडीला कट लागल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाले. या वादादरम्यान हवेत गोळीबार करण्यात आला. त्यामुळे बिबवेवाडी परिसरात खळबळ उडाली.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गाडीला कट लागल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर आरोपीने हवेत गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारामुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण होते. या गोळीबारात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. याप्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोघांनी हवेत गोळीबार केला. मध्यरात्री गोळीबाराचा आवज ऐकून बिबवेवाडीमधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते. फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला.

गोळीबार करत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळीबारात कुणीही जखमी नाही. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबार करणाऱ्या २ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश भालके आणि देवा डोलारे असे गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर चार आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT