हिवाळी अधिवेशन: गोपीचंद पडळकरांना जीवे संपवण्याचा सरकारचा डाव- फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप Saam Tv
मुंबई/पुणे

हिवाळी अधिवेशन: गोपीचंद पडळकरांना जीवे संपवण्याचा सरकारचा डाव- फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

सत्ताधारी म्हणतात कशाला सुरक्षा घेता, पोलीस काय त्यांच्या बापाचे आहे का? असा संतप्त सवाल फडणवीसांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर ७ नोव्हेंबर २०२१ ला सांगली (Sangli) जिल्ह्यात हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर (Attack) सरकारचा आपली हत्या करण्याचा कट होता असा आरोप पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला होता. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. ज्यांचं ३०२ होणार होतं त्यांच्यावरच ३०७ लावण्याचं काम झालं असं फडणवीस हिवाळी अधिवेशनात (Winter Session) म्हणाले आहेत. तसंच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करत दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. (Winter Session: Govt's plot to kill Gopichand Padalkar- Fadnavis makes serious allegations against Govt.)

हे देखील पहा -

फडणवीस म्हणाले की, डम्परमध्ये दगड आणि काठ्या आहेत हे पोलीस डायरीत लिहिलं आहे. 200 ते 250 लोकांचा जमाव होता हे स्टेशन डायरीत नोंद आहे, पण कारवाई नाही केली पोलीस वाट पाहत बसले. ज्या पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ते पोलीस शूटिंग करत होते. पडळकर यांच्यावर 307 कलम लावण्याचा प्रयत्न झाला. ज्या व्यक्तींनी हे केले त्या व्यक्तींचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो आहेत. हा महाराष्ट्र आहे ना? काय चाललं आहे असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, एखाद्या सदस्याला असे टार्गेट केले जात असेल तर काम कसे करायचे? ज्यांनी 307 लावला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे आणि निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. सत्ताधारी म्हणतात कशाला सुरक्षा घेता, पोलीस काय त्यांच्या बापाचे आहे का? असा संतप्त सवाल करत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका, पडळकरांवरील 307 चा खोटा गुन्हा तत्काळ परत घ्या अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यासाठी आता हे कामकाज थांबवा आणि पहिल्यांदा बैठक बोलवा, ज्यांनी चुकीची कारवाई केले त्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहीजे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT