bhagat singh koshyari  saam tv
मुंबई/पुणे

गुजराती बांधवांनी मराठी शिकलं पाहिजे; राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले? वाचा...

राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती नागरिकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईतून (Mumbai) गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. असे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. यानंतर त्यांनी महाराष्ट्राची माफी देखील मागितली. आता राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती नागरिकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला आहे. (Bhagat Singh Koshyari News)

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश असून, प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख आहे. मात्र, असे असले तरीही, सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान असून, महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

'देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरूप होणे गरजेचे असल्याचे कोश्यारी म्हणाले. आपण स्वतः महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वत: 5 ते 6 महिन्यांत चांगली मराठी शिकलो' असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले. (Bhagat Singh Koshyari News Marathi)

राज्यपाल मुंबईबद्दल काय म्हणाले होते?

मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं.

मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं होतं ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले होते.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे भाजपने सुद्धा राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यपालांची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर एक परिपत्रक काढत त्यांनी महाराष्ट्राची माफी देखील मागितली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

Solapur Anjangaon: अंजनगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला; बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT