ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव - आनंंदराज आंबेडकर Saam Tv
मुंबई/पुणे

ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव - आनंंदराज आंबेडकर

१ जानेवारीचा विजयस्तंभावरील शौर्यदिन हा लाखोंच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

रोहिदास गाडगे

कोरेगांव-भिमा, पुणे: ओमिक्रॉनची भीती दाखवून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत सरकार निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा गंभीर आरोप आनंदराज आंबेडकरांनी (Anandraj Ambedkar) केला आहे. तसेच ओमिक्रॉनचा (Omicron) धोका जास्त नसल्याने या वर्षीचा कोरेगाव भिमा (Koregaon - Bhima) येथे १ जानेवारीचा विजयस्तंभावरील शौर्यदिन हा लाखोंच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. (Government's ploy to postpone elections for fear of Omicron - Anandraj Ambedkar)

हे देखील पहा -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव-भीमा विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ओमिक्रॉनची भीती दाखवून केंद्र आणि राज्य सरकार निवडणुका (Elections) पुढे ढकलू पाहत आहे असा गंभीप आरोप त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान भारतातही ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असून कालपर्यंत (२६ डिसेंबर) देशात ४४२ कोरोना रुग्ण होते, यात सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातच आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT