एसटी संप - Saam Tv
मुंबई/पुणे

#STStrike एक-दोन दिवसांत अटकसत्र सुरु होणार? (पहा व्हिडिओ)

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपविण्यासाठी 'मेस्मा' लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य सरकार येत्या दोन दिवसांत मेस्मा लावण्याची शक्यता आहे. हा कायदा लागू होताच एसटी कर्मचाऱ्यांचे अटक सत्र सुरु होण्याची दाट शक्यता आहे

साम टिव्ही

(सुशांत सावंत)

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपविण्यासाठी 'मेस्मा' (MESMA) लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य सरकार येत्या दोन दिवसांत मेस्मा लावण्याची शक्यता आहे. हा कायदा लागू होताच एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) अटक सत्र सुरु होण्याची दाट शक्यता आहे. ST workers may be arrested in a day or two

एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ सुरु असलेला संप (ST Strike) मोडण्यासाठी आता राज्य सरकारने (Maharashtra Government) कंबर कसली आहे. पगारवाढ मिळूनही एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. एसटीचे विलिनीकरण (Merger of ST) हीच संपकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकारने समिती नेमूनही कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकार आक्रमक झाले आहे. एसटी संपावर 'मेस्मा' लावला जाताच आंदोलनकर्त्यांना अटक करायला सुरुवात होईल, असे सूत्रांकडून 'साम टिव्ही'ला सांगण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनीही कडक कारवाई करण्याशिवाय आता पर्याय उरला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 'मेस्मा' लागू होताच राज्यभरात अटकसत्र सुरू होण्याची शक्यता आहे. कोणतीही नोटीस किंवा पूर्व सुचना न देता अटकेची कारवाई सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. व्हाॅट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाईची शक्यता आहे.

दरम्यान, याच संदर्भात चेन्ने यांनी 'साम टिव्ही'ला खास मुलाखतही दिली आहे. त्यात ते म्हणाले, "मेस्मा कायदा अतिशय स्पष्ठ आहे. राज्य सरकारला कायदा करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे संपाला मेस्मा कायदा लागू शकतो. आम्ही 9 हजार लोकांचे एकाच दिवशी निलंबन केलेले नाही. राज्य सरकारने कुणावरही तात्काळ कारवाई केलेली नाही. सरकारची कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका राहिलेली नाही. सरकार नुसतं कारवाई करत आहे, अशी परिस्थिती नाही. आता जे वेतन होईल त्यात किमान 9 हजारची वाढ झालेली आहे. इतकी वाढ कधीच झालेली नव्हती. आता कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,"

''जे कुणी अफवा पसरवत आहेत त्याला आम्ही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मेस्मा ऍक्टमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की एसटी महामंडळ ही राज्य सरकारची सेवा आहे. कर्मचाऱ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये. 500 कोटींपेक्षा जास्त फटका आम्हाला बसला आहे. व्हाॅट्स अॅप आणि सोशल मीडियातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत," असेही चेन्ने यांनी सांगितले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT