सरकार आरोग्य विभागाच्या भरतीचा निकाल लावण्याच्या तयारीत- दत्ता भरणे (पहा Video) Saam Tv
मुंबई/पुणे

सरकार आरोग्य विभागाच्या भरतीचा निकाल लावण्याच्या तयारीत- दत्ता भरणे (पहा Video)

सरकार निकाल लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती साम टिव्हीला दत्तात्रय भरणेंनी माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आरोग्य विभागाच्या भरतीबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांचा निकाल लवकरच लागेल, अशी माहिती भरणे यांनी साम टीव्हीला दिली. परीक्षेसंदर्भातील तक्रारींची तपासणी करुन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

व्हिडीओ-

ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळेस विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी चा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गामधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत होती. याकरिता शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) सप्टेंबर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. परंतु आरोग्य विभागाचा गट -ड चा पेपर रात्रीच फुटला असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. अनेक विद्यार्थ्यांना इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहिती मिळाली होती. सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ होत आला, त्यामुळे पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ;

मात्र, या परीक्षेकरिता उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

उमेदवारांना कोणत्या अडचणी आल्या होत्या ?

- परिक्षा ४ दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र आणखी मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- २ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना २ ठिकाणी एकाच दिवशी परिक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होत आहे अस्या अडचणी विद्यार्थ्यांना आल्या होत्या.

निकाल लावु नका अशी विद्यार्थ्यांची मागणी;

पेपर फुटीच्या प्रकरणामुळे परीक्षेचा निकाल न लावण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती, यावर दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे की, न्यासा कंपनीबद्दल तक्रारी दाखल झाल्या आहेत. याविषयी आरोग्य विभाग पूर्ण तपास करून योग्य तो निर्णय घेईल. तसेच लवकरच आरोग्य विभाग याविषयी रिजल्ट जारी करेल.

ऐनवेळी परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांनी रात्र रेल्वेस्टेशनवर काढली होती;

ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवरच रात्र काढावी लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळजन्य परिस्थितीतही शेतकऱ्यांची जिद्द; नाशिकमध्ये कांदा लागवडीला सुरुवात

Mirror Work Dupatta: नवरात्रीत दिसा स्टायलिश आणि ट्रेंडी; मिरर वर्क दुपट्टा सेटचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स पाहा

Ration Card Update : मोठी बातमी! ऑक्टोबरपासून 1.58 कोटी रेशन कार्ड होणार तात्पुरते बंद; तुमचं कार्ड तर नाही ना?

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT