Massive Fight Between Street Vendor Gangs Near Goregaon Station Saam
मुंबई/पुणे

गोरेगावमध्ये परप्रांतीय भाजीविक्रेत्यांची दादागिरी, २ गटामध्ये जबर हाणामारी; एकाचा मृत्यू

Massive Fight Between Street Vendor Gangs Near Goregaon Station: गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे साम्राज्य आहे. या अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक तक्रारी करून देखील मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

Bhagyashree Kamble

  • गोरेगाव रेल्वे स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांची दादागिरी

  • दोन गटामध्ये तुफान हाणामारी

  • हाणामारीत एका भाजीविक्रेत्याचा मृत्यू

संजय गडदे, साम टिव्ही

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळत आहे. यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, याचा परमोच्च बिंदू गोरेगाव पश्चिम येथे पाहायला मिळत आहे. गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर दोन भाजीविक्रेत्या टोळ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका भाजीविक्रेत्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.

भरदिवसा बेस्ट डेपोवरच ही धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. मुकेश ब्रिजमोहन कोरी, ब्रिजमोहन देवताप्रसाद कोरी आणि सुशील ब्रिजमोहन कोरी अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, २ भाजीवाल्या टोळींमध्ये जुन्या वादातून सतत भांडणं होत. जुन्या वादातील कारणांवरून भांडण चिघळले. याच वादातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. गोरेगाव पश्चिम स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे जाळे पसरलेले आहे. या फेरीवाल्यांविरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या. तरीही मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा

गोरेगाव पश्चिम स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भाजीवाल्यांचे जाळे पसरलेले आहे. या फेरीवाल्यांविरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या. तरीही मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, या हाणामारीनंतर स्थानिक नागरिकांमध्ये पालिकेविरोधात प्रचंड नाराजी उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं

Dhurandhar: भारतातील टॉप ५ चित्रपटांमध्ये 'धुरंधर'ची एन्ट्री; ३१ दिवसांत कमावले ८०० कोटी, 'या' चित्रपटांचा केला रेकॉर्ड ब्रेक

ONGC गॅस गळती; अनेक ठिकाणी लागली आग, दूर दूरपर्यंत पसरल्या ज्वाळा; गावं करण्यात आली खाली|Video Viral

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात भीषण अपघात, एसटी बस आणि दुचाकी समोरासमोर धडकल्या; तीन जणांचा मृत्यू

KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट; शहरात तगडा फौजफाटा तैनात, अवैध दारूविक्री विरोधातही कारवाई

SCROLL FOR NEXT