Gopichand Padalkar & Vijay Wadettiwar
Gopichand Padalkar & Vijay Wadettiwar Saam TV
मुंबई/पुणे

'फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं' पडळकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई: ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुसती वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगाला ४५० कोटींची घोषणा केली असा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. वास्तवात फक्त मागे दिलेले साडेचार कोटी तेही खर्च करण्याचे आदेश आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पुर्णवेळ सचिव. आणि आयोगाचे संशोधक सोलापूरात (Solapur) आणि आयोग पुण्यात. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी "फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं" अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

ओबीसींच्या (OBC Reservation) नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात. आता तर हद्दच झाली उद्याच्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. आणि त्या करीता उद्धव ठाकरे सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार, असे जाहीर केले असल्याची माहिती पडळकर यांनी केली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार.

ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही. आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार, म्हणून मी ओबीसी बांधवांना आव्हान करतो की तुमच्या जीवावरती लालदिवा मिळवणारे आणि तुम्हाला फसवणारे ओबीसी मंत्री जिथे भेटतील तिथे गाठा आणि जाब विचारा असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

SCROLL FOR NEXT