Good News For Mumbaikars air quality index improved due to unseasonal rain Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Air Quality: अवकाळी पावसामुळे मुंबईकरांचा मोठा फायदा; हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा

Satish Daud

Mumbai Air Quality Latest Update

एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला असताना दुसरीकडे याच पावसाचा मुंबईकरांना मोठा फायदा झाला आहे. मुंबईत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणात मोठी घट झाली असून हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही महिन्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासाळली होती. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे मुंबईची हवा दुषित झाली होती. हीच बाब लक्षात घेता उच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यास केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती.

दुसरीकडे मुंबई महापालिकेकडून धूळप्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्यात आली होती. मात्र, आता धुळप्रदूषणाने बेजार झालेल्या मुंबईकरांच्या मदतीला अवकाळी पाऊस धावून आला आहे. अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे.

पुढील ३ ते ४ दिवस हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील हवेची गुणवत्ता पुढीलप्रमाणे मुंबई - ५५ AQI, कुलाबा - ५२, भांडुप - ३२, मालाड - ५०, माझगाव - ४४, वरळी - २२, बोरिवली - ५४, बीकेसी - १०७, चेंबूर - ६८, अंधेरी - ५३, नवी मुंबई - ७१

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

० ते ५० एक्यूआय - उत्तम

५० ते १०० एक्यूआय - समाधानकारक

१०१ ते २०० एक्यूआय - मध्यम

२०१ ते ३०० एक्यूआय - खराब

३०१ ते ४०० एक्यूआय - अतिशय खराब

४०१ ते ५०० एक्यूआय - गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT