Good News For kokan Citizens Mumbai-Goa Kashedi Ghat Traffic Start today Konkan Ganeshotsav ssd92 Saam TV
मुंबई/पुणे

Konkan News: कोकणवासियांना बाप्पा पावला, आता प्रवास होणार सुसाट; कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू

Satish Daud

Konkan Ganeshotsav 2023 Latest Updates: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटातील प्रवास आता करावा लागणार नाही. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून म्हणजेच सोमवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. रविवारी या बोगदा मार्गाची ट्रायल रन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

मुंबई-गोवा महामार्गावरील या एकमेव बोगद्यामुळे २५ मिनिटांचे अंतर अवघ्या १९ मिनिटांत पार करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे यामुळे प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. शिवाय कशेडी घाटातील अवघड, धोकादायक प्रवास आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.

मात्र, हा बोगदा सध्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) तात्पुरत्या स्वरूपात खुला केला जाईल. आणि या काळात अवजड वाहनांना प्रवेश नसेल केवळ हलकी वाहने या बोगद्यातून प्रवास करू शकतील. कशेडी घाट सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कशेडी घाट रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडणारा अवघड वळणांचा मार्ग आहे. रस्ता रूंद असला तरी तीव्र उतारांमुळे घाटाचा मार्ग पार करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावरून लहान मोठ्या सर्वच प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ असते.

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट आहे. तळकोकणात जाणारे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करतात. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची कसरत वाचणार आहे. धोकादायक वळणं असलेल्या या घाटातून पावसाळ्यात प्रवास करणं खूप धोकादायक असतं. कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार केला जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT